शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने व प्रतिमा पुजनाने झाली.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.यासीन मुजावर सर व विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.शांतीनाथ मगदुम सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पुजन संपन्न झाले.
यानंतर पर्यवेक्षक श्री.शांतीनाथ मगदुम सर यांनी आपल्या मनोगतातून लालबहादूर शास्त्री यांच्या सामाजिक कार्या विषयी माहिती आपल्या मनोगतातून सांगितली.
तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.यासीन मुजावर सर यांनी आपल्या मनोगतातून महात्मा गांधी यांच्या जीवनाविषयी व स्वातंत्र्य लढ्यातील योगदाना विषयी माहिती सांगितली.
या कार्यक्रमा प्रसंगी विद्यार्थी- विद्यार्थीनी, शिक्षक-शिक्षिका,
शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.हेमगिरे एस.के. सर यांनी केले
आभार श्री. पाटील डी.पी. यांनी मानले.











