Edition

शिराळा पश्चिम भागात दाट धुके शिराळा पश्चिम भागात दाट धुक्याचे साम्राज्य; जनजीवनावर परिणाम..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात शुक्रवारी पहाटेपासून दाट धुके पसरल्याने संपूर्ण परिसर धुक्याच्या दुलईने झाकून गेला. डोंगररांगा, शेतशिवार आणि रस्त्यांवर धुक्याची चादर पसरल्याने परिसराचे निसर्गरम्य रूप पाहायला मिळाले.
पहाटेच्या सुमारास धुक्याची तीव्रता अधिक असल्याने काही ठिकाणी दृश्यमानता कमी झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना वाहनांचे दिवे सुरू ठेवून सावधगिरीने प्रवास करावा लागला. विशेषतः डोंगराळ आणि वळणावळणाच्या रस्त्यांवर वाहनांचा वेग कमी झाल्याचे चित्र दिसून आले.
गेल्या काही दिवसांपासून शिराळा पश्चिम भागात वातावरणात बदल जाणवत असून सकाळच्या वेळी गारवा आणि धुके, तर दिवसभर ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. दाट धुक्यामुळे शेती परिसरातील पिकांवरही वातावरणाचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचे हवामानाकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सकाळच्या धुक्यात न्हाऊन निघालेल्या हिरव्यागार डोंगररांगा आणि शेतशिवाराचे मनोहारी दृश्य नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. या निसर्गरम्य वातावरणाचा अनेकांनी मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढून आनंद घेतला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!