Edition

अपयशावर मात करत मालेवाडीच्या सोमनाथ वाघमारे यांची ‘टीआयएसएस’ मधून पीएच.डी. शिक्षणाच्या बळावर सर्वोच्च शिखर गाठणारा हा प्रवास आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ईश्वरपूर प्रतिनिधी –
कधीकाळी दहावीच्या परीक्षेत अपयशाचा सामना करणाऱ्या एका ग्रामीण भागातील तरुणाने जिद्द, सातत्य आणि संघर्षाच्या जोरावर देशातील सर्वोच्च शैक्षणिक मानल्या जाणाऱ्या संस्थेतून डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे. दहावीतील अपयशाने खचून न जाता शिक्षणाच्या बळावर सर्वोच्च शिखर गाठणारा हा प्रवास आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.प्रसिध्द डॉक्युमेंट्री चित्रपट निमति आणि संशोधक डॉ. सोमनाथ वाघमारे यांनी नामांकित ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’, मुंबई येथून आपली पीएच.डी. यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. येथून पीएच.डी. मिळवणारे ते सांगली जिल्ह्यातील पहिले संशोधक ठरले आहेत.डॉ. सोमनाथ वाघमारे यांनी प्रा. लक्ष्मी लिंगम यांच्या मार्गदर्शनाखाली आपला संशोधन प्रबंध पूर्ण केला. महाराष्ट्रातील जात, चित्रपट आणि सांस्कृतिक राजकारणः मराठी चित्रपटांचा एक अभ्यास हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य विषय होता. या प्रबंधाच्या माध्यमातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील जातीय समीकरणे, प्रतिनिधित्व आणि सांस्कृतिक वास्तवाचा चिकित्सक व सखोल वेध घेतला आहे. वाळवा तालुक्यातील मालेवाडी सारख्या ग्रामीण भागातून सुरू झालेला डॉ. वाघमारे यांचा प्रवास केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरताच मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तारला आहे.एक संवेदनशील डॉक्युमेंट्री चित्रपट निर्माते म्हणून त्यांनी वंचित आणि शोषित घटकांच्या प्रश्नांना जागतिक पटलावर मांडले आहे. या प्रवासात त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी यांसारख्या जगप्रसिध्द शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन व्याख्याने व सादरीकरणे केली आहेत.आपल्या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. वाघमारे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच त्यांच्या संपूर्ण वैचारिक व सामाजिक प्रवासाचे मुख्य प्रेरणास्थान आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!