Edition

हुपरी-कोल्हापूर मार्गावरील उचगाव-यादववाडी पुलाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करा; अन्यथा रस्ता रोकोचा इशारा. करवीर तालुका शिवसेना (UBT) चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर (प्रतिनिधी):
उदय साळुंखे, हुपरी-कोल्हापूर या अत्यंत वर्दळीच्या मुख्य राज्य मार्गावरील उचगाव – यादववाडी येथील ओढ्यावरील पुलाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी जोरदार मागणी करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कोल्हापूरचे उपअभियंता यांना निवेदन देण्यात आले.
हुपरी-कोल्हापूर हा राज्य मार्ग उचगाव, गडमुडशिंगी, कोडोली मार्गे थेट कर्नाटकात जाणारा मुख्य मार्ग आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, कामगार, शेतकरी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर बस, कंटेनर व इतर वाहनांची वाहतूक सुरू असते. मात्र, उचगाव-यादववाडी येथील ओढ्यावरील पुलाचे काम गेल्या काही दिवसांपासून अर्धवट आणि बंद स्थितीत आहे.
काम अपूर्ण राहिल्याने वाहनधारकांना व स्थानिक नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पुलाजवळच एक मोठी शाळा असून, दररोज २० ते २५ स्कूल बस लहान मुलांना घेऊन येथून धोकादायक रीतीने प्रवास करत आहेत. तसेच रात्रीच्या अंधारात गडमुडशिंगी बाजूने वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वारांना वळणाचा अंदाज न आल्याने येथे अनेक अपघात घडले आहेत. अधिकारी व ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळेच हे काम रखडल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या व इशारा:
पुलाचे उर्वरित काम कधी पूर्ण होणार याची स्पष्ट कालमर्यादा (टार्गेट डेट) प्रशासनाने जाहीर करावी.
वाहनधारकांची गैरसोय व सुरक्षितता लक्षात घेऊन काम प्राधान्याने त्वरित सुरू करावे.
* काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास ‘हुपरी-कोल्हापूर रस्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल आणि या सर्व परिणामास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील.
या निवेदनावर करवीर तालुका प्रमुख राजू यादव, शहर प्रमुख विशाल देवकुळे, उपतालुका प्रमुख राहुल गिद्टे, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, तसेच दिलीप देसाई, अजित चव्हाण, रामराव पाटील, कृष्णा लटके, सुनील परपाणी, राजू सांगावकर, योगेश लोहार, प्रकाश मुदुगडे, बाबूराव पाटील, सचिन ताराहिवळ, बापूसाहेब नलवडे आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!