अंसडोली (ता. गगनबावडा) येथील नवविचार तरुण मंडळाचे संयोजक रोहन कांबळे यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सोनाली विलास पाटील, पंचायत समिती सदस्या छाया प्रकाश देसाई तसेच प्रकाश देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घेतली.
शिबिरासाठी व्हिजन मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल, कोपर्डी येथील डॉ. शुभम जाधव, किरण कोतुळकर, सुजाता धुमाळ, पूजा सूर्यवंशी, समीर कांबळे यांच्यासह संपूर्ण वैद्यकीय पथक उपस्थित होते. डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन केले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक सतीश पाटील, कृष्णा पाटील, तातोबा कांडर, नामदेव गुरव, अनिकेत कांबळे तसेच मंडळाचे कार्यकर्ते प्रदीप पाटील, वैभव गुरव, भरत सुतार, अनिकेत कांबळे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच आरोग्य तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल नवविचार तरुण मंडळाच्या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
विशाल क्रांती न्यूजसाठी : माजगाव प्रतिनिधी अनिल जाधव, माजगाव, ता. पन्हाळा











