
डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : सेलू येथील महावितरण कंपनी कार्यालयात असणारे कनिष्ठ अभियंता, उपकार्यकारी अभियंता (अधिकारी), कार्यकारी अभियंता( अधिकारी) यापैकी उपकार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता हे छ. संभाजी नगरचे असल्यामुळे व कनिष्ठ अभियंता हे लातूरचे असल्यामुळे सुट्टीच्या दिवशी हे आपापल्या घरी जात असतात. परंतु सुट्टीच्या दुसऱ्या दिवशी वर्किंग डे ला कार्यालयीन वेळ हा नऊ वाजल्यापासून सुरू होतो आणि ग्राहक देखील मोठ्या प्रमाणात आपल्या असणाऱ्या समस्या घेऊन वेळेवर म्हणजे नऊ नंतर महावितरण कार्यालयात येतात त्यावेळी अधिकारी वर्गापैकी कोणीही उपस्थित नसत परिणामतः ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो, ग्राहक अधिकाऱ्यांची देवा सारखी वाट बघत असतात. म्हणजे रेल्वे वेळ असेल किंवा स्वतःचे खाजगी वाहन असेल अधिकारी यांना यायला उशीर होतो त्यावेळेस तास दोन तास नाहक ग्राहकांचा वेळ वाया जातो. परिणामत: याचा त्रास हा महावितरण ग्राहकांना सहन करावा लागतो. एखादा ग्राहकाने फोन करून अधिकाऱ्यांना साहेब आपल्याला यायला किती वेळ लागेल? अशी विचारपूस केली असता अधिकाऱ्यांचे उत्तर असे येते मी साईटवर आहे. मी अमुक अमुक मीटिंगमध्ये आहे. यायला थोडासा वेळ लागेल असेही कारणे ग्राहकांना ऐकावयास मिळतात, जर अधिकारी कामानिमित्त किंवा एखादी साईट डाऊन असेल तर त्याची हालचाल रजिस्टरला नोंद असते परंतु हालचाल रजिस्टर देखील विचारपूस केली असता दाखवल्या जात नाही किंवा त्यामध्ये तशी कुठली नोंदणी नसते. अशावेळी सर्व काही राम भरोसे चालत असते. साहेब येतील तेव्हा त्या ग्राहकांच्या असणाऱ्या समस्या ह्या मार्गी लागतात. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ऑटो डिस्कनेक्शन ग्राहकांना माहिती होत नाही की आपला विद्युत पुरवठा हा स्मार्ट मीटरमुळे खंडित झालेला आहे त्यामुळे ग्राहक हा मीटरमध्ये असणारी लाईट बघतो आणि त्याच्या घरामध्ये विद्युत पुरवठा हा नसल्यामुळे तो परेशान होतो आणि महावितरण कार्यालयाकडे धाव घेतो तेव्हा त्याला सांगितले जाते या स्मार्ट मीटरमध्ये बिल न भरल्यास ऑटो डिस्कनेक्शन होते वीज पुरवठा हा कुठलाही लाईनमन ग्राहकाच्या घरी न जाता तो तांत्रिकदृष्ट्या बंद होत असतो. त्यामुळे ऑनलाईन आपले बिल भरल्यास तो परत अर्धा ते एक तासात चालू होईल असे त्या ग्राहकाला सांगण्यात येते.
स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांच्या लाईट बिलात देखील जास्तीची तफावत येत असल्याच्या बऱ्याच ग्राहकांच्या तक्रारी आहेत या तक्रारी देखील सेलू सब डिव्हिजन ला बिल दुरुस्ती मर्यादा कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ग्राहकांचे बिल दुरुस्त होण्यासाठी विलंब लागत असतो. परिणामतः ग्राहकांच्या रकमेवरचे व्याज वाढत असते हा त्या ग्राहकाला बिलाच्या स्वरूपात भरावा लागतो.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष यांची प्रतिक्रिया
उपकार्यकारी अभियंता श्री शंकरवार व कनिष्ठ अभियंता श्री उंडगे हे दोन्हीही अधिकारी सेलू महावितरण कार्यालयात कार्यरत झाले तेव्हापासून ग्राहकांच्या असणाऱ्या बऱ्याच समस्या पहिल्यापेक्षा दूर झालेले आहेत परंतु हे दोघेही सुट्टीचे दिवस वगळता मुख्यालयात राहतात. त्यामुळे काम अगदी सुरळीत चालते सुट्टीच्या दिवशी आपल्या परिवाराकडे जात असल्यामुळे दुसऱ्या दिवशी वर्किंग डे ला विलंब होतो. अशा ग्राहकांच्या तक्रारी आहेत हे देखील तितकेच खरे आहे.











