Edition

वारणा व्हॅली स्कूलमध्ये सरपंच अस्मिता पाटील यांच्या हस्ते श्रींची आरती स्व. भगवानराव पाटील तात्यांच्या ९१व्या जयंतीनिमित्त संस्थेच्या उत्कर्षासाठी गणरायाकडे प्रार्थना.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सागाव (ता. शिराळा) येथील स्व. माजी आमदार भगवानराव पाटील शिक्षण संस्था संचलित वारणा व्हॅली स्कूल व ज्युनिअर कॉलेज (सीबीएसई) येथे गणेशोत्सवानिमित्त सागावच्या सरपंच तथा स्व. भगवानराव पाटील (तात्या) यांच्या स्नुषा सौ. अस्मिता पाटील यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली.
गणपती ही विद्येची देवता मानली जाते. स्व. भगवानराव पाटील तात्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाने सुरू झालेल्या या शिक्षण संस्थेने गेल्या १३ वर्षांत सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ५० गावांमध्ये शैक्षणिक क्षेत्रात आपला नावलौकिक निर्माण केला आहे. केजीपासून बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या या संस्थेत सुमारे ५० शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व बसचालक समर्पित भावनेने कार्यरत आहेत.
शाळेत विराजमान झालेली श्री गणेशाची मूर्ती ही शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांची आणि श्रद्धेची साक्ष ठरली. विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या कालावधीतच दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी स्व. भगवानराव पाटील तात्यांची ९१ वी जयंती साजरी होत असल्याने या निमित्ताला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
यावेळी बोलताना सरपंच सौ. अस्मिता पाटील म्हणाल्या, “यावर्षीचा गणपती संस्थेतील सर्व घटकांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य देवो. संस्थेचा शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात असाच उत्कर्ष होत राहो. कैलासवासी तात्या व आई यांचे नाव सातासमुद्रापार दैदिप्यमान होवो आणि हा ज्ञानवृक्ष असाच बहरत राहो,” अशी प्रार्थना त्यांनी गणेशचरणी केली.
यावेळी प्राचार्य करडे सर, प्राचार्य सौ. मुग्धा पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail
error: Content is protected !!