Edition

मलिकवाड येथील श्री. मल्लिकार्जुन महादेव मंदिर जीर्णोद्धारासाठी रयत सौहार्द बँकेकडून 51 हजारांची भरीव आर्थिक मदत.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मलिकवाड (ता.चिकोडी) येथील ग्रामदैवत श्री.मल्लिकार्जुन (महादेव) मंदिराच्या जीर्णोद्धाराचे पवित्र कार्य सुरू असून, या बांधकामासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे.

मंदिर जीर्णोद्धाराच्या या कार्याला हातभार लावत मलिकवाड रयत सौहार्द बँकेने ₹५१,०००/- ची भरीव आर्थिक मदत दिली आहे.

रयत सौहार्द बँकेने मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दिलेले हे योगदान कौतुकास्पद आहे. बँकेच्या या सामाजिक बांधिलकीमुळे मंदिर जीर्णोद्धाराच्या कार्याला निश्चितच बळ मिळाले आहे.

या आर्थिक मदतीचा धनादेश स्वीकारण्यासाठी बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सन्माननीय संचालक मंडळ तसेच कर्मचारीवर्गाने मंदिर जीर्णोद्धार समितीच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानपूर्वक आमंत्रित केले. यावेळी बँकेच्या वतीने मंदिराच्या पवित्र कार्यासाठी देण्यात आलेली मदत सुपूर्द करण्यात आली.

श्री. मल्लिकार्जुन महादेव मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने मलिकवाड रयत सौहार्द बँकेचे चेअरमन मा. भाऊसाहेब कुडचे, व्हाईस चेअरमन मा. बाळासाहेब रामा पाटील, सर्व सन्माननीय संचालक मंडळ, जनरल मॅनेजर मा. प्रशांत मठपती, असिस्टंट मॅनेजर विशाल कुडचे, रोहन पाटील, संजय चौगुले तसेच सर्व कर्मचारीवर्गाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

महादेवाच्या चरणी श्रद्धेने केलेले हे योगदान मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कार्याला नवी ऊर्जा देणारे असून, समाजातील विविध घटकांनी पुढे येऊन या पवित्र कार्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने करण्यात आले.

विशालक्रांती न्यूज. प्रतिनिधी अमर माने मलिकवाड.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail
error: Content is protected !!