ईश्वरपूर प्रतिनिधी – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त एस. के. इंटरनॅशनल सैनिक स्कूल येथे ‘आशीर्वादाचा दिवा’ सेवा संकल्प अभियान उत्साहात राबविण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी सेवा, राष्ट्रभक्ती आणि कर्तव्यभावनेचा संकल्प केला. देशभरात १०० नवीन सैनिक शाळांची मुहूर्तमेढ रोवून ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा यावेळी उल्लेख करण्यात आला.
सैनिक शाळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि देशसेवेची भावना निर्माण होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तरुणाईच्या मनात राष्ट्रसेवेची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या उपक्रमांच्या माध्यमातून मोदींचा वाढदिवस सेवा संकल्पाने साजरा करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोगी आयुष्य, यश आणि दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली.











