Edition

शक्तिपीठ महामार्ग रद्दच करा; बाधित शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा.. वाळवा तालुक्यातील शेतकरी-प्रशासन जनसंवाद मेळावा – १६-१७ प्रश्नांवर प्रशासनाला धरले धारेवर…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ईश्वरपूर प्रतिनिधी – शक्तिपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचा आणि प्रशासनाचा संवाद मेळावा राजारामबापू पाटील नाट्यगृह, ईश्वरपूर येथे पार पडला. या मेळाव्यात वाळवा तालुक्यातील बाधित गावांतील शेतकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. “शक्तिपीठ महामार्ग रद्दच करा,” अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी यावेळी मांडली.
मेळाव्यास प्रांताधिकारी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) अधिकारी भोसले तसेच प्रशासकीय प्रतिनिधी उपस्थित होते. कामेरी गावचे सरपंच रणजित पाटील, सचिन जाधव सरपंच संभाजी पाटील, अँड. विजय पाटील, प्रकाश कदम, इटकरेचे शामराव पाटील, ऐतवडे खुर्दच्या माजी सरपंच ज्योत्स्ना पाटील यांच्यासह बाधित गावांतील शेतकऱ्यांनी सुमारे १६ ते १७ तातडीचे प्रश्न प्रशासनासमोर उपस्थित केले.
महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) नेमका काय आहे, स्थानिक पाणीपुरवठा संस्थांचे किती नुकसान होणार, तसेच भूसंपादन व पुनर्वसनासाठी २०१३ चा कायदा लागू न करता १९५५ च्या जुन्या कायद्याचा आधार का घेतला जात आहे, असे प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केले.
दरम्यान, २००५, २०१९ आणि २०२१ मधील महापुरानंतर वडनेरे समिती तसेच आयआयटी रूड्डक्केने अहवालांमध्ये सांगली-बहे आणि हरिपूर-सुरुड-सागाव दरम्यानचे नदीपात्र संवेदनशील असल्याचे नमूद करण्यात आल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला. अशा परिस्थितीत नदीपात्रातील अतिक्रमणाला बंदी असताना या बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का होत आहे, असा सवालही त्यांनी केला.
वाळवा तालुक्यातील १२ गावांमधील सुपीक शेती, विहिरी आणि सिंचन व्यवस्था महामार्गाच्या कामामुळे बाधित होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या नुकसानीचा प्रशासनाने गांभीर्याने विचार केलेला नाही, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
“आमच्या सुपीक जमिनी आणि बागायती क्षेत्र कोणत्याही परिस्थितीत महामार्गासाठी दिले जाणार नाही. प्रसंगी आमचा जीव गेला तरी चालेल; मात्र शक्तिपीठ महामार्गाला आमचा कायमस्वरूपी तीव्र विरोध राहील. शासनाने हा महामार्ग तात्काळ रद्द करावा,” अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.
प्रशासनाकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी कॉ. धनाजी गुरव, बी. जी. पाटील यांच्यासह वाळवा तालुक्यातील बाधित गावांतील शेतकरी आणि महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!