
ईश्वरपूर प्रतिनिधी दि.१४
रेठरे धरण :- शासनाने डी जे वाद्यावर बंदी घातल्याने रेठरे धरण तालुका वाळवा येथील सुमारे पंधराचे वर गणेश मंडळानी बेंजो, झांझपथक वाद्यांच्या गजरात, तरुणांनी नाचत,व गणरायाचा जयघोष करत गणरायाची गावातून भव्य मिरवणूक काढत स्वागत केले . येथील अजिंक्य गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बेंजोच्या गजरात गणरायाचे स्वागत केले, येथील त्रिमूर्ती गणेश मंडळाचे हे २५ वे वर्ष असून त्यांनी झांझपथकाच्या गजरात गणरायाचे स्वागत केले,न्यू अमर गणेश मंडळ, रामलिंग गणेश मंडळाच्या युवकांनी शिवशाही ब्रास बँड/ बेंजो नाशिक यांना पाचारण केले होते, अमर गणेश मंडळ, श्री साई गणेश मंडळ यांनी पारंपरिक बेंजोच्या वाद्यात गणरायाची गावातून मिरवणूक काढून प्रतिष्ठापना केली. श्रीराम गणेश मंडळ, शिवतेज गणेश मंडळ ,न्यू सनी गणेश मंडळ,झुंझार गणेश मंडळ ,ज्योतिर्लिंग गणेश मंडळ यांनी गणरायाच्या आकर्षक मूर्तीसह सजविलेल्या ट्रॅक्टर मधून गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत आनंदात,नाचत गणरायाचे स्वागत केले. दुपारी चार वाजता सुरू झालेल्या मिरवणुका सुमारे पाच तास सुरू होत्या,उशिरा गणरायाचे स्वागत करून मंडळातील स्टेजवर प्रतिष्ठापना करण्यात आली.











