Edition

मलिकवाड येथील श्री.मल्लिकार्जुन(महादेव) मंदिर जीर्णोद्धारासाठी जनशक्ती पतसंस्थेची २१ हजारांची मदत.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मलिकवाड (ता.चिकोडी) येथील अल्पावधीतच नावलौकिकास आलेल्या जनशक्ती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, मलिकवाड यांच्या वतीने ग्रामदैवत श्री.मल्लिकार्जुन (महादेव) मंदिराच्या जीर्णोद्धार व बांधकामासाठी २१ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

संस्थेच्या वतीने मंदिर जीर्णोद्धार समितीकडे रु. २१,०००/- चा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
ग्रामदैवत श्री.मल्लिकार्जुन (महादेव) मंदिराच्या जीर्णोद्धाराचे व बांधकामाचे काम सुरू असून, या पवित्र कार्यासाठी संस्थेने दिलेले योगदान निश्चितच मोलाचे ठरणार आहे.

श्री.मल्लिकार्जुन मंदिर हे मलिकवाड ग्रामस्थांच्या श्रद्धा, धार्मिक परंपरा आणि एकतेचे प्रमुख केंद्र आहे. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी विविध व्यक्ती, संस्था व ग्रामस्थांकडून मदतीचा ओघ सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून जनशक्ती पतसंस्थेने दिलेली २१ हजार रुपयांची मदत मंदिराच्या बांधकामासाठी उपयुक्त ठरणार आहे.

जनशक्ती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या आर्थिक योगदानाबद्दल श्री.महादेव मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने तसेच समस्त मलिकवाड ग्रामस्थांच्या वतीने संस्थेच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी
अमर माने, मलिकवाड.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!