Edition

मदर तेरेसा फाउंडेशनच्या वतीने माता वेलंकनी यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे पुलगेट सोलापूर बाजार येथे ख्रिश्चन बांधव वास्तव्यात आहेत नऊ दिवसांची प्रार्थना पूर्ण करून माता वेलंकनी यांचा जन्मोत्सव सोहळा मदर तेरेसा फाउंडेशनच्या वतीने अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. आरोग्यदाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेलंकनी मातेच्या जयंतीनिमित्त नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम घेत दहाव्या दिवशी सोलापूर बाजार पुलगेट मार्गे विविध ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये ख्रिस्ती बांधवांसहित इतर जाती-धर्मातील भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. सोलापूर बाजार परिसरात माता वेलंकनी यांच्या भोवती मेणबत्ती,रांगोळी व
हारफुलांनी सजावट करण्यात आली होती. यावेळी भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे संयोजक सेंट मदर तेरेसा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बबलू अँथोनी रॉयल यांनी केले तसेच यावेळी स्थानिक चर्चे फादर रॉक, फादर विल्यम, ऍडव्हड जेकब, फ्रान्सिस जेकब, रिबोलो जेकब, जेसिंता रॉयल, न्यानंसि जेकब, स्टेला जेकब, यांच्यासह स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!