पुणे प्रतिनिधी शंकर जोग, वेतन वाढ आणि नोकरी कायम करणे या मागण्यांसाठी हरियाणातील हिसार भागात सफाई कर्मचाऱ्यांनी दीर्घकाळ संप पुकारल्याने सफाई कर्मचाऱ्यावर पोलिसांकडून मारहाण
झाल्याचा निषेधार्थ पुणे शहर मेहतर वाल्मिकी महासंघाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी मेहतर वाल्मिकी महासंघाच्या वतीने करण्यात आली या संदर्भाचे निवेदन पुणे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आले. सदर आंदोलनामध्ये पुणे शहर मेहतर वाल्मिकी महासंघाचे अध्यक्ष रवीभाई परदेशी, महासचिव नरेश इंद्रसिंग जाधव, किशोर वाघेला, किशोर भेंडवाल, अर्जुनभाई सोलंकी,महेंद्र लालबिगे, सुरेश देडुंडा, गोपाल वाघमारे, कधीर पठाण, आदी उपस्थित होते.











