Edition

शिराळा कृषी उत्पन्न बाजार समितीस शेतकरी भवनासाठी १ कोटी ५२ लाख ९६ हजार ५३८ रुपयांची शेतकरी भवन इमारतीस मंजुरी. शेतकरी बांधवांसाठी सुसज्ज व सर्व सुविधांनीयुक्त शेतकरी भवन उभारणीचा मार्ग मोकळा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा, प्रतिनिधी :
कृषी उत्पन्न बाजार समिती, शिराळा, ता. शिराळा, जि. सांगली येथे ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ योजनेअंतर्गत नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रु. १ कोटी ५२ लाख ९६ हजार ५३८ इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. शासनाच्या मंजुरीमुळे शिराळा तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी सुसज्ज, सुविधायुक्त व उपयोगी शेतकरी भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शेतकरी हितासाठी बाजार समितीचे सातत्यपूर्ण प्रयत्न

गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समिती, शिराळा यांनी बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्यासोबतच शेतकरी बांधवांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.

तालुक्यातील मांगले, सागाव, चरण तसेच शिराळा मार्केट यार्ड येथे जनावरांचा बाजार सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याचबरोबर मार्केट यार्डमध्ये धान्य व भाजीपाला खरेदी-विक्री बाजार सुरू करण्याचा उपक्रम देखील राबविण्यात आला. मात्र स्थानिक व्यापारी व शेतकरी बांधवांचा , योग्य समन्वय साधून हे उपक्रम भविष्यात पुन्हा सक्षम करण्याचा बाजार समितीचा प्रयत्न आहे.शेतकरी व बाजार समितीच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू ठेवण्यात आला.

शेतकरी बांधवांना शासकीय बैठका, शेतकरी मेळावे, कृषीविषयक मार्गदर्शन, शासकीय प्रशिक्षण कार्यक्रम तसेच विविध योजनांची माहिती व अन्य मूलभूत सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सुसज्ज शेतकरी भवनाची आवश्यकता होती. ही गरज लक्षात घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती, शिराळा यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ योजनेअंतर्गत नवीन शेतकरी भवनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला.

या प्रस्तावास आता शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाल्याने शिराळा तालुक्यातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शेतकरी भवनामुळे मिळणार विविध सुविधा

नवीन शेतकरी भवनामध्ये शेतकरी बांधवांसाठी बैठक व्यवस्था, शासकीय व कृषीविषयक बैठका, शेतकरी मेळावे, प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम तसेच विविध शासकीय उपक्रम आयोजित करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. बाजार समितीत येणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी मुक्काम व मूलभूत सुविधांची सोय उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

या शेतकरी भवनाच्या माध्यमातून शिराळा तालुक्यातील शेतकरी बांधवांना कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, विविध शासकीय योजना, बाजारपेठेची माहिती, प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळण्यासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध होईल.

विशेष आभार

शेतकरी भवनाच्या मंजुरीसाठी सहकार्य व मार्गदर्शन करणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा. सौ. सुनेत्रा अजितदादा पवार, पणन मंत्री मा. श्री. जयकुमार रावल, माजी मंत्री मा. श्री. शिवाजीराव नाईक, माजी आमदार मा. श्री. मानसिंगराव नाईक (भाऊ) तसेच मा. जि. प. सदस्य व युवक नेते श्री. रणधीर नाईक यांचे कृषी उत्पन्न बाजार समिती, शिराळा सभापती .उपसभापती.संचालक कर्मचारी. व शेतकरी. व्यापारी बांधवांच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

चौकट : मनोगत

“शेतकरी भवन म्हणजे शेतकरी बांधवांसाठी हक्काचे व्यासपीठ”

उपसभापती श्री. विजय महाडिक म्हणाले
आज शेतकरी भवनासाठी रु. १ कोटी ५२ लाख ९६ हजार ५३८ रुपयांच्या अंदाजपत्रकास शासनाची प्रशासकीय मान्यता मिळणे ही शिराळा तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे. या भवनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सुविधा व प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यास निश्चितच मोठी मदत होईल.

शेतकरी हा केंद्रबिंदू मानून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून भविष्यातही शेतकरी हिताचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील.”»

— श्री. विजय महाडिक
उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, शिराळा

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!