Edition

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे अतिउत्कृष्ट सेवा पदक मिळाल्याबद्दल विविध पक्षातील मान्यवरांच्या हस्ते सत्कार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी – पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना त्यांच्या उल्लेखनीय आणि कर्तव्यदक्ष सेवेबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मानाचे अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल पुणे शहरातील विविध क्षेत्रातील आणि पक्षातील प्रमुख लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने पोलीस आयुक्तांचा शॉल पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. दरम्यान यावेळी उत्कृष्ट सेवेबद्दल सहपोलीस आयुक्त संजय दराडे यांचाही शिष्टमंडळांनी विशेष सत्कार केला. पुणे पोलीस आयुक्त पदाची सूत्रे हातात घेतल्यापासून अमितेश कुमार यांनी शहरातील गुन्हेगारी नियंत्रण. अवैद्य धंद्यावरील धडक कारवाई आणि सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण या त्रिसूत्रीवर विशेष भर दिला आहे. त्यांच्या या च गतिमान आणि धाडसी कार्यपद्धतीमुळे पुणे शहर आणि पोलीस दलाचा लौकिक अत्यंत वाढल्याची भावना या सत्कार प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केली.
या विशेष सत्कार प्रसंगी पुणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक ॲड. आय्युब शेख, पुण्याचे माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ थेंडे, शिवसेना नेते अजय भोसले, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य बाळासाहेब जानराव, रिपब्लिकन सोशॅलिस्ट पक्षाचे अध्यक्ष राहुल डंबाळे, शिवसेनेचे मिलिंद अहिरे, सामाजिक कार्यकर्ते आबिद सय्यद, आदी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री आबिटकरांचा पुढाकार; कारखानदार-शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक घेणार प्रति टन ऊसदरावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन; शेतकऱ्यांच्या मागण्या आणि कारखानदारांच्या भूमिकेत समन्वय साधण्याचा प्रयत्न

गोकुळच्या सत्तासंघर्षात मुश्रीफ-आबिटकरांची सामंजस्याची भूमिका; माघार की डॅमेज कंट्रोलची रणनीती? न्यायालयीन सुनावणी आणि जनतेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सावध भूमिका; गोकुळच्या सत्तासंघर्षाला नवे राजकीय वळण

गोकुळ अध्यक्षपदाचा पेच कायम; सतेज पाटील यांची थेट उच्च न्यायालयात धाव! १२ संचालकांच्या अनुपस्थितीमुळे निवडणूक प्रक्रिया रखडली; १४ संचालकांच्या कोरमवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

traffic tail

error: Content is protected !!