Edition

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर :
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय कोल्हापूर अंतर्गत, ललितकला भवन राजारामपुरी कोल्हापूर येथे ८० वा स्वातंत्र्यदिन प्रमुख पाहुणे सुरेश केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे सुरेश केसरकर (अध्यक्ष – राज्य गुणवंत कामगार असोसिएशन तथा माजी मंडळ सदस्य) यांनी, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी, आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या हौतात्म्यांच्या आहुतीला अनुसरून कार्य करावे तसेच आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे अनेकांच्या बलिदानाचे फलित आहे, त्यांच्या हौतात्म्याप्रती आपली संवेदना जागृत असायला हवी. त्याचबरोबर राजकीय नेत्यांना, अनेकांचे बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळाले आहे याचा विसर पडता कामा नये, असे मत व्यक्त केले.
कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये महात्मा गांधीनी अहिंसेच्या आंदोलनातून मिळविलेल्या स्वातंत्र्याची माहिती देत, आपण त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न करायला हवा असे सांगितले.
महा. अंनिसचे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या सदिच्छा देत आपल्या वर्तनातून देश बालशाली करण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन केले.
गुणवंत कामगार अनिता काळे यांनी स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याच्या अनुषंगाने सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजारोहण करून ध्वजाला सलामी देण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्वांच्यावतीने वंदे मातरम, जन – गण – मन हे राष्ट्रगीत व महाराष्ट्र राज्य गीत गाण्यात आले.
यावेळी गुणवंत कामगार सर्वश्री संजय सासने, भगवान माने, अनिता काळे, संभाजी थोरात, महादेव चक्के, शिवाजी चौगुले, रघुनाथ मुधाळे, विजय आरेकर, संजय चव्हाण, सुभाष पाटील, दिनकर आडसूळ, बाळासाहेब कांबळे, रामदास देसाई (जिल्हा प्रधान सचिव, महा अंनिस), नाट्य कलावंत संजय पाटील, मोहन घाडगे, कमर्शीयल बँकेचे सरदेसाई, सौ. सरदेसाई, अमोल डांगे तसेच शाळकरी मुलांबरोबरच परिसरातील व कामगार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होतें.
विजय शिंगाडे (कामगार कल्याण अधिकारी) यांच्या हस्ते मान्यवर पाहुणे तसेच उपस्थितांना रोपटे व पेन देवून स्वागत करण्यात आले.
मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे निवेदन संघसेन जगतकर (केंद्र संचालक) यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय खराडे यांनी मानले. अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

traffic tail

आमदार सत्यजित देशमुख यांच्या मागणीला मोठे यश; शिराळा उपसा सिंचन योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यतेची ग्वाही:वारणा धरणात बोटिंगसाठी दोन बोटी देणार; शिवसृष्टीसाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन — कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ.

error: Content is protected !!