Edition

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार पेठ सिंचन भवन येथे सुमारे एकहजार शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि बॅग वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय सचिव डॉ.अभिषेक बोके यांच्या हस्ते वाटप करण्यात आले होते. तसेच यावेळी विविध भागांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष महेंद्र लालबिगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर सदस्य नीलमताई लालबिगे यांनी केले होते. यावेळी हरीश लडकत, इस्तियाक बागवान, राहुल तांबे, नीताताई गायकवाड, स्वप्नाली लालबिगे, रोनक लालबिगे, आयाज शेख, फरदीन पटेल, शैलेंद्र लालबिगे, रंजीता लालबिगे, दिनेश अर्धाळकर, उमेश परदेशी, दिनेश परदेशी, रसूल शेख, आदि उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!