
जिल्हा प्रतिनिधी : संतोष भालेराव,
वाशिम : लोक कलावंत सांस्कृतिक मंच, रिसोड यांच्या वतीने लोककवी वामनदादा कर्डक यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी रिसोड येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
बैठकीत यंदाची लोककवी वामनदादा कर्डक जयंती केशवनगर (बालाजी सहकारी साखर कारखाना परिसर) येथे मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरी करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. या जयंती महोत्सवात परिसरातील सर्व भजनी मंडळांचा सहभाग राहणार असून सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन लोक कलावंत सांस्कृतिक मंचाचे तालुका अध्यक्ष गौतमदादा खंदारे व त्यांच्या समितीच्या वतीने करण्यात येत आहे. जयंती उत्सव यशस्वी करण्यासाठी विविध जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले असून सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रम भव्यदिव्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या आढावा बैठकीस मा. पोलीस पाटील गजानन साबळे, पत्रकार विनोद भालेराव, अंकुश सोनुने (अध्यक्ष), वसंत जुमडे, महादू साबळे, प्रल्हाद आल्हाट, गंभीर खंदारे, लक्ष्मण पडघन, भास्कर पवार, दिनकरराव बोडखे, साहेबराव नवघरे, वसंतराव सुर्वे, सतीश नवघरे, कडूजी आल्हाट, शालिकराम पठाडे, कैलास सुर्वे, रेखाताई जाधव, वंदनाबाई भगत, कासुबाई पडघन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.










