Edition

सहकार भूषण पुरस्काराने गौरविलेल्या डॉ. विनय कोरे यांचा आ. सत्यजित देशमुख यांच्या हस्ते सत्कार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सहकारी संघ व ‘सहकारी महाराष्ट्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त आयोजित सहकार गौरव पुरस्कार २०२६ अंतर्गत प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘सहकार भूषण पुरस्कार’ जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचा कार्यसम्राट आमदार सत्यजित देशमुख यांनी शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी आ. सत्यजित देशमुख यांनी डॉ. विनय कोरे यांनी सहकार क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, ग्रामीण विकासासाठी दिलेले योगदान आणि वारणा उद्योग समूहाच्या माध्यमातून उभारलेले विकासाचे आदर्श मॉडेल याबद्दल गौरवोद्गार काढले. सहकार क्षेत्रातील त्यांचे नेतृत्व आणि दूरदृष्टीमुळे राज्याच्या सहकार चळवळीला नवी दिशा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भविष्यातही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्र अधिक सक्षम व बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी डॉ. विनय कोरे यांनी सत्काराबद्दल आ. सत्यजित देशमुख व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. हा पुरस्कार वैयक्तिक नसून सहकार चळवळीशी जोडलेल्या सर्व कार्यकर्ते, सभासद, शेतकरी, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक परिश्रमाचा सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले कार्य यापुढेही अविरत सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले.
या सत्कार समारंभास सुखदेव पाटील, विकासराव देशमुख, अनिल (काका) देशमुख, वारणा साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील, वारणा दूध संघाचे संचालक सागर पाटील, वारणा बँकेचे संचालक अभिजित पाटील, नाटोलीचे सरपंच तानाजी पाटील, देववाडीचे सरपंच शुभम खोत, बाळासाहेब खोत, नगरसेवक महेश पाटील, राजेंद्र पाटील, नारायण खोत, शशिकांत पाटील महाराज, प्रदीप शेटे, उत्तम गावडे, बाबा पाटील, सुरेश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमात डॉ. विनय कोरे यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला असून, उपस्थितांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!