Edition

महिलांसाठी आर्थिक साक्षरता व उद्योजकता जनजागृती कार्यक्रम संपन्न.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

बेडकिहाळ, येथे आचार्य देशभूषण आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या महिला कल्याण कक्षाच्या (Women Welfare Cell) घ्या वतीने महाविद्यालयातील महिला अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, रुग्णालयातील महिला कर्मचारी तसेच विद्यार्थिनींसाठी ‘आर्थिक साक्षरता व महिला उद्योजकता जनजागृती कार्यक्रम’ उत्साहात आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धीरज के. पाटील होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड, कोल्हापूर येथील क्लस्टर मॅनेजर व आर्थिक साक्षरता तज्ज्ञ श्री. अमोल कदम उपस्थित होते. त्यांनी आर्थिक नियोजन, बचत, गुंतवणूक, बँकिंग सेवा, डिजिटल आर्थिक व्यवहार तसेच महिलांसाठी उपलब्ध उद्योजकतेच्या संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. आर्थिक स्वावलंबनासाठी नियोजनबद्ध बचत आणि योग्य गुंतवणुकीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
महिला कल्याण कक्षाच्या समन्वयक डॉ. वैशाली एच. पी. यांनी कार्यक्रमाच्या उद्देशाची माहिती देऊन विषयाची ओळख करून दिली. यावेळी महिला कल्याण कक्षाच्या सदस्या डॉ. अर्चना जुगळे तसेच वरिष्ठ अध्यापक डॉ. हर्षद मडवणे उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर आयोजित संवादात्मक प्रश्नोत्तर सत्रात उपस्थित महिला कर्मचारी व विद्यार्थिनींनी आर्थिक व्यवस्थापन, गुंतवणूक आणि डिजिटल व्यवहारांबाबत विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले.
महिलांमध्ये आर्थिक साक्षरता वाढविणे, उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि आर्थिक स्वावलंबनाची जाणीव निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!