Edition

महावितरण उपकेंद्रावर शिवसेना उबाठाचे आंदोलन गडमुडशिंगी शेतीच्या भारनियमन तसेच स्मार्ट मीटर बंदसाठी हल्लाबोल

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गांधीनगर: प्रतिनिधी
उदय साळुंखे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गडमुडशिंगी ता. करवीर येथे महावितरण कार्यालयाला शेती विभागातील होत असलेल्या अनियमित भारनियमन तसेच स्मार्ट मीटर सक्तीबाबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख पोपट पांडुरंग दांगट यांच्या नेतृत्वाखाली गावातील सर्व मळेकरी, शिवसैनिक आणि ग्रामस्थ यांच्यासमवेत निवेदन देऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. नूतन जिल्हाप्रमुख विराज पाटील प्रमुख

उपस्थित होते.

गडमुडशिंगी महावितरण शाखा अंतर्गत अघोषित भारनियमनामुळे सर्वसामान्य शेतकरी, नागरिक व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच ग्राहकांवर सक्तीने लादल्या जाणाऱ्या स्मार्ट मीटरच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता रोहित कुलकर्णी यांना निवेदन दिले.

शिवसेनेच्या या आंदोलनाची गंभीर दखल घेत महावितरण

अधिकाऱ्यांनी त्वरित भारनियमन सुरळीत करण्याचे आणि स्मार्ट मीटरची सक्ती न करण्याचे अधिकृत पत्र शिवसेना शिष्टमंडळाला सुपूर्द केले आहे. जिल्हाप्रमुख विराज पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही त्वरित करण्यास सूचना दिल्या. यावेळी बाबुराज पाटील, मनोज कुरळे, नितीश लोकरे, गणेश कामीरे, मोहन माळी, बंडू माळी, पोपट माळी, शशिकांत सावंत, नारायण सुतार, अनिकेत दळवी, गणेश माळी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!