Edition

USDT ट्रेडिंगचे आमिष; सायबर फसवणुकीसाठी ‘म्युल’ बँक खाती उघडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

इचलकरंजी : प्रतिनिधी
USDT डॉलर ट्रेडिंगचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी ‘म्युल’ (बनावट व्यवहारासाठी वापरली जाणारी) बँक खाती उघडून त्यामार्फत फसवणुकीची रक्कम इतर खात्यांमध्ये वळविल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस अंमलदार गणेश दिलीप लोहार (बक्कल क्र. 1517, शहापूर पोलीस ठाणे) यांनी सरकार पक्षातर्फे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप आण्णासो सातपुते (वय 39, रा. शहापूर, इचलकरंजी) व विक्रम जुवेकर (रा. बेळगाव, कर्नाटक, पूर्ण नाव उपलब्ध नाही) यांनी फेब्रुवारी 2026 ते 20 जुलै 2026 या कालावधीत संगनमत करून USDT डॉलर ट्रेडिंगच्या नावाखाली लोकांकडून पैसे स्वीकारण्यासाठी ‘म्युल’ बँक खाती सुरू केली. या खात्यांद्वारे फसवणुकीची रक्कम विविध बँक खात्यांमध्ये वळवून सायबर फसवणुकीस मदत केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 370/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे (बक्कल क्र. 1047) यांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक दरेकर या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!