Edition

वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी संधींचे मोठे दालन; सकारात्मक दृष्टीकोनातून यश मिळवा – डॉ. सुनील शिंदे

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रायबाग प्रतिनिधी : चिक्कोडी टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या एमसीए विभागाचे प्रमुख डॉ. सुनील शिंदे यांनी वाणिज्य शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजच्या काळात अनेक करिअरच्या संधी उपलब्ध असल्याचे सांगत, प्रत्येक विषय सकारात्मक दृष्टीकोनातून आत्मसात करून जीवनात उच्चांक गाठण्याचे आवाहन केले.
येथील मलगौडा पाटील कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये बी.कॉम. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ व विविध युनिटच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. देशाच्या आर्थिक प्रगतीत वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. के. पाटील होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासावर भर देऊन शैक्षणिक प्रगती साधावी, तसेच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांशी असलेले नाते जपतानाच सध्याच्या विद्यार्थ्यांनीही यशाची नवी शिखरे गाठावीत, अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्थानिक व्यवस्थापन मंडळाचे सदस्य एम. एम. निशांदर, व्ही. पी. पाटील, एल. बी. पाटील, एस. ए. कवतकोप्प, एम. एस. हंजे, व्ही. एस. पुजारी, व्ही. ए. मंडकी यांच्यासह महाविद्यालयातील व्याख्याते व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!