Edition

यड्राव येथे युवा आचार्य श्री विद्यासागर महाराज व सहसंघाच्या उपस्थितीत पंचकल्याण महामहोत्सवाचा पारंपरिक सवाल कार्यक्रम धार्मिक उत्साहात पार पडला.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 

 

 

 

यड्राव प्रतिनिधी उत्तम जगताप,
शिरोळ तालुक्यातील यड्राव श्री 1008 चंद्रप्रभ तीर्थंकर पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव व विश्वशांती महायाग 2027 निमित्त रविवारी (दि. 19) प.पू. युवाआचार्य श्री 108 विद्यासागरजी महाराज यांच्या पवित्र सान्निध्यात व सहसंघाच्या उपस्थितीत पंचकल्याण महोत्सवाचा पारंपरिक सवाल कार्यक्रम धार्मिक उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विविध धार्मिक विधींसाठी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लाखो रुपयांच्या बोली लावल्या. यामध्ये दादासो शिवगोंडा पाटील यांनी १६ लाख ५१ हजार रुपयांची सर्वोच्च बोली लावत इंद्र-इंद्रायणी यजमानपदाचा मान मिळविला.
धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या सवाल कार्यक्रमात तीर्थंकर माता-पिता पदासाठी सौ. व श्री महावीर भुजगोंडा पाटील यांनी ७ लाख ७ हजार ७७७, धनसंपत्ती कुबेर पदासाठी सौ. व श्री चंद्रकांत आण्णा पाटील यांनी ४ लाख ७५ हजार, चक्रवर्ती पदासाठी सौ. व श्री देवेंद्र सुरगोंडा पाटील यांनी ३ लाख २५ हजार, ईशान्य इंद्र पदासाठी सौ. व श्री विरेंद्र अशोक मालगावे यांनी २ लाख २५ हजार, सुवर्ण सौभाग्यवती पदासाठी सौ. व श्री प्रकाश मल्लाप्पा भागाजे यांनी ५ लाख ७५ हजार, तर महायज्ञ नायक पदासाठी सौ. व श्री राजगोंडा धुळगोंडा पाटील यांनी २ लाख ५१ हजार रुपयांची बोली लावून संबंधित यजमानपदाचा मान मिळविला.
याशिवाय अष्टकुमारिका, मंच उद्घाटन, ध्वजारोहण, लोकांतिक देव, पंचामृत, अर्घ्य विधान, मंगल कलश स्थापना, प्रथम दिन जलयात्रा, वेदीस्थापना आदी धार्मिक विधींसाठीही भाविकांनी उत्साहाने बोली लावत सहभाग नोंदविला.
दरम्यान, पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवासाठी अन्नदानाच्या माध्यमातून सहकार्य करणाऱ्या दानशूर व्यक्तींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
श्रद्धा, भक्ती आणि दानपरंपरेचा संगम घडविणारा हा सवाल कार्यक्रम भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरला.

यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, दक्षिण भारत जैन सभेचे महामंत्री अनिल बागणे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर, अजय पाटील, यड्रावकर, पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव समितीचे अध्यक्ष जिवंधर मुरचिटे, श्री 1008 चंद्रप्रभ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महावीर ऊर्फ बंडू पाटील, माजी उपसरपंच विजय पाटील, भागवत दानोळे प्रकाश अकिवाटे, नेमिनाथ पाटील, सुशांत पाटील, कुलभूषण पाटील, विवेक पाटील, क्रांती मुराळे,
राजकुमार पाटील, दादासो दानोळे, राकेश पाटील यांच्यासह महोत्सव समितीचे पदाधिकारी, श्रावक-श्राविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!