Edition

विद्यार्थ्यांच्या मोर्चावर लाठीमार; जंतरमंतरवरील आंदोलन पेटले मेट्रो स्टेशन बंद, इंटरनेट सेवा विस्कळीत; दिल्ली पोलिसांचा मोठा बंदोबस्त

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

दिल्ली : वृत्तसेवा – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीने जंतरमंतर येथे आयोजित केलेल्या आंदोलनाला बुधवारी उग्र वळण लागले. आंदोलक विद्यार्थ्यांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याची माहिती समोर आली आहे.
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी राजधानीत मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. जंतरमंतर परिसरासह दिल्लीतील विविध भागांत मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. आंदोलकांना संसदेकडे जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेडिंग केली होती. मात्र, पोलिसांचा विरोध झुगारून आंदोलक संसदेकडे जाण्याचा प्रयत्न करत असल्याने परिस्थिती चिघळली.
या आंदोलनात विरोधी पक्षातील अनेक नेते सहभागी झाले आहेत. आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह, आझाद समाज पक्षाचे प्रमुख खासदार चंद्रशेखर आझाद यांच्यासह अभिनेते प्रकाश राज आणि सोनम वांगचुक यांच्या पत्नीही आंदोलनात सहभागी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
खासदार चंद्रशेखर आझाद यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना, “युवकांवर अन्याय होत आहे. त्यांचा आवाज बनण्यासाठी आणि त्यांना साथ देण्यासाठी मी या आंदोलनात सहभागी झालो आहे,” असे म्हटले.
मेट्रो स्थानकांवर पोलिसांची नजर
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील काही मेट्रो स्थानकांवर गर्दी वाढल्यास प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद करण्याची तयारी करण्यात आली आहे. परिस्थितीनुसार विविध स्थानकांवर निर्बंध लागू केले जाऊ शकतात. तसेच काही भागांत इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!