Edition

पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या मुलींच्या संघाला विजेतेपद सुब्रतो मुखर्जी शालेय फुटबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी; १७ वर्षांखालील गटात विभागीय फेरीत धडक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर प्रतिनिधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि अकोला जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुब्रतो मुखर्जी शालेय फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात चमकदार खेळाचे प्रदर्शन करीत संघाने एसओएस बिर्ला कॉलनी शाखेच्या संघाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ असा पराभव केला. या विजयामुळे पोदार स्कूलच्या संघाने विभागीय फेरीत प्रवेश निश्चित केला आहे.
स्थानिक लालबहादूर शास्त्री स्टेडियमवर १३ ते १७ जुलैदरम्यान ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने एसओएस हिंगणा संघाचा २-० असा पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत नोवेल स्कूल (स्टेट बोर्ड) संघाविरुद्ध झालेल्या चुरशीच्या सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ असा विजय मिळवत संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला.
विजेत्या संघात आराध्या गवारगुरु, आराध्या माळी, पलक चांडक, शुभ्रा चव्हाण, प्रणिती बागडे, रिद्धी राठोड, आस्था झा, स्वरा देवनाले, स्वरा बोदडे, वैदही कावळे, कनक वाधवानी, धनश्री देशमुख, आनंदी ठाकरे, जान्हवी पांडे, परिधी निकम, शुभ्रा कचरे, तनुश्री पारस्कर आणि नम्रता मस्के यांचा समावेश आहे.
प्राचार्य नायर यांच्याकडून विजेत्या संघाचे कौतुक
अकोला जिल्ह्यात दरवर्षी शालेय क्रीडा मोसमाची सुरुवात सुब्रतो मुखर्जी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेने करण्याची परंपरा आहे. या स्पर्धेत विजेतेपद मिळवत विभागीय फेरीत प्रवेश केल्याबद्दल पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या नीता तलरेजा-नायर यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले. विभागीय फेरीतही संघ दमदार कामगिरी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!