विशालक्रांती न्यूज.
देशाच्या सर्वोच्च सहकारी संस्थेत श्री.अण्णासाहेब जोल्ले चा घुमणार बुलंद आवाज.
15-0 च्या एकतर्फी विजयाने राष्ट्रीय सहकार क्षेत्रात दमदार नेतृत्वाची नोंद !
35+ वर्षांच्या सहकार क्षेत्रातील कार्याचा राष्ट्रीय पातळीवर गौरव
भारताच्या सहकार चळवळीसाठी अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीत, चिक्कोडीचे माजी खासदार तसेच बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी (BDCC) बँकेचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब जोल्ले यांची देशातील सर्वोच्च सहकारी संस्थांपैकी एक असलेल्या नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया (NCUI), नवी दिल्ली च्या संचालक मंडळावर संचालक म्हणून निवड झाली आहे.
श्री अण्णासाहेब जोल्ले यांनी प्रतिस्पर्धी श्री संजीव कुशाळकर यांचा १५-० अशा एकतर्फी मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळविला. सहकार क्षेत्रातील त्यांच्या नेतृत्वावर आणि कार्यक्षमतेवर देशभरातील सहकारी प्रतिनिधींनी व्यक्त केलेला हा भक्कम विश्वास मानला जात आहे. सहकार क्षेत्रातील तब्बल ३५ वर्षांहून अधिक काळाच्या निष्ठावान सेवेला आणि उल्लेखनीय योगदानाला मिळालेली ही मोठी पावती असल्याची भावना व्यक्त होत आहे.
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री मा. अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देशात सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि आधुनिक करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतीय जनता पक्ष आणि सहकार भारती यांनी अनुभवी आणि दूरदृष्टी असलेल्या सहकारी नेतृत्वाला राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व मिळावे यासाठी सक्रिय भूमिका बजावली.
या ऐतिहासिक विजयामागे केंद्रीय सहकार मंत्री मा. अमित शहा, केंद्रीय राज्यमंत्री मा. मुरलीधर मोहोळ, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मा. बी. एल. संतोष, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी संरक्षक श्री डी. एन. ठाकूर, नाफेडचे संचालक श्री अशोक ठाकूर तसेच निवडणूक प्रभारी श्री कुलदीप चाहेल यांचे मार्गदर्शन, सहकार्य आणि मोलाचे योगदान लाभले.











