

हुपरी प्रतिनिधी – 44 वर्ष अखंड अविरत सुरू असलेली हुपरी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी पालखीच्या दर्शनासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या माजी खासदार डॉ. निवेदिता माने (वहिनी) यानी दिंडीचे दर्शन घेत खासदार धैर्यशील माने यांनी मंजूर केलेल्या छत्रपती शिवरायांच्या मूर्तीच्या कामाची पाहणी केली दिनांक 16 ते 26 जुलै पर्यंत चाललेल्या परमपूज्य श्री सद्गुरूदास गोपालकृष्ण स्वामी महाराज पालखी ह.भ.प.हरी साळुंखे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पायीवारी मध्ये समस्त वारकरी भक्तजन मोठ्या उत्साहाने सहभागी होत असत 26 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त महाप्रसादाची ही आयोजन करण्यात आले आहे.यावेळी दिंडी व्यवस्थापन समिती अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती प्रतिष्ठापना समिती अध्यक्ष व गावातील समस्त वारकरी भक्तजन पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











