Edition

लादेवाडीत भरवस्तीत बिबट्याचा शिरकाव; पाळीव कुत्र्यावर हल्ला, ग्रामस्थांमध्ये भीती..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा प्रतिनिधी – शिराळा तालुक्यातील लादेवाडी येथील खटकळ वस्तीमध्ये बुधवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने भरवस्तीत शिरून पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसंत विठ्ठल खोत यांच्या घराजवळ असलेल्या शिकारी पाळीव कुत्रीवर बिबट्याने अचानक झडप घातली. या हल्ल्यात कुत्री गंभीर जखमी झाली. आरडाओरड होताच बिबट्याने घटनास्थळावरून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली असून, रात्रीच्या वेळी बाहेर पडताना नागरिकांना सतर्क राहावे लागत आहे. लादेवाडी व परिसरात यापूर्वीही बिबट्याचा वावर आढळून आला असल्याने नागरिकांनी वन विभागाकडे तातडीने पाहणी करून पिंजरा लावण्याची आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
वन विभागाने या घटनेची दखल घेऊन परिसरात गस्त वाढवावी तसेच नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे बाहेर न पडणे, लहान मुलांवर व पाळीव प्राण्यांवर लक्ष ठेवणे आणि बिबट्या दिसल्यास तत्काळ वन विभागाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!