Edition

मांगले–सावर्डे बंधाऱ्यालगतचा डांबरी रस्ता व झाडे गेली वाहून; वारणा नदीच्या पुराचा तडाखा…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगली वृत्तसेवा – सांगली जिल्ह्यातील वारणा नदी अजूनही दुथडी भरून वाहत असून पुराचा फटका आता नदीकाठच्या रस्त्यांनाही बसू लागला आहे. मांगले–सावर्डे बंधाऱ्यालगतचा संपर्क रस्ता आणि अनेक झाडे पुराच्या पाण्यात वाहून गेली
गेल्या काही दिवसांपासून चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.
या वाढलेल्या पाण्याचा मोठा फटका मांगले–सावर्डे येथील वारणा नदीवरील बंधाऱ्यालगतच्या रस्त्याला बसला आहे. मांगले बाजूचा साईड रस्ता पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे खचून थेट वाहून गेला आहे.
बंधाऱ्याचे बॅरिकेड काढले नसल्याने बॅकवॉटर मोठ्या प्रमाणात साचले असून नदीच्या वेगवान प्रवाहामुळे रस्त्यासह अनेक झाडेही उन्मळून पडली आहेत.
रस्ता वाहून गेल्यामुळे मांगले आणि सावर्डे परिसरातील नागरिकांचा संपर्क विस्कळीत झाला असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
प्रशासनाने नागरिकांना पुराच्या पाण्यातून किंवा या धोकादायक मार्गावरून प्रवास करू नये, तसेच पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.
सध्या परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!