Edition

उकळू धबधब्याचे मनोहारी रूप पर्यटक आकर्षित ..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिराळा प्रतिनिधी – सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरात गेल्या पाच..सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध उकळू धबधबा तुडुंब भरून वाहत आहे. धबधब्याचे विहंगम रूप पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

चांदोली वन्यजीव अभयारण्यातील सुमारे ३०० फूट उंचीवरून कोसळणारा उकळू धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने प्रवाहित होत आहे. मुसळधार पावसामुळे धबधब्याभोवती दाट धुके, हिरवाई आणि पाण्याचा घुमणारा आवाज यामुळे संपूर्ण परिसर निसर्गसौंदर्याने खुलून गेला आहे.
या मनमोहक दृश्याचा आनंद घेण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून पर्यटक मोठ्या संख्येने येथे दाखल होत आहेत. अनेक पर्यटक धबधब्याच्या पार्श्वभूमीवर छायाचित्रे आणि व्हिडिओ टिपताना दिसत आहेत.
दरम्यान, सततच्या पावसामुळे चांदोली धरणातील पाणीसाठाही झपाट्याने वाढत असून धरण सुमारे ५० टक्के भरले आहे. त्यामुळे परिसरातील नद्या आणि ओढ्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.
वन विभागाने मात्र पर्यटकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात धबधब्याजवळील रस्ते आणि दगड निसरडे होतात, तसेच पाण्याचा प्रवाह अचानक वाढू शकतो. त्यामुळे धबधब्याच्या अतिजवळ न जाता सुरक्षित अंतर राखूनच निसर्गसौंदर्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!