Edition

भरबाजारात रक्तरंजित थरार! पतीचा जीवघेणा हल्ला;पत्नीचा निर्घुन खून,पेठवडगाव हादरले.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर- पेठवडगाव येथे शहरातील मुख्य बाजारपेठेत भरदिवसा आणि भर पावसात घडलेल्या एका थरारक घटनेने पेठवडगाव शहर हादरुन गेले.
घरगुती वादाचे रुपांतर थेट रक्तरंजित हत्याकांडात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.पतीने पत्नीवर भररस्त्यात कोयत्याने सपासप वार करून तिचा निर्घुन हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.या दुर्दैवी घटनेत अमृता दिपक कांबळे यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार पती-पत्नीत काही काळापासून वाद सुरु असल्याची माहिती मिळाली.त्याच वादातून आरोपीने पत्नीला मुख्य बाजारपेठेत गाठून तिच्यावर कोयत्याने वार केल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनूसार अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे बाजारपेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाले.
नागरिकांनी आरडा ओरडा करत घटनास्थळी धाव घेतली.मात्र तोपर्यंत महिला गंभीर जखमी होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात कोसळली.घटनेमुळे काही काळ बाजारपेठेतील व्यवहार विस्कळीत झाले आणि परिसरात मोठी गर्दी झाली.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्याचे समजले असून खूनासाठी वापरण्यात आलेले शस्त्र जप्त करण्यासह पुढ़ील तपास सुरु आहे.
खूनामागील नेमके कारण कौटुंबिक वादाचे स्वरुप आणि इतर कोणतेही कारण या घटनेला कारणीभूत होते का,याचा तपास पोलिस करीत आहेत.संबंधित व्यक्तीची चौकशी तसेच उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली जात आहे.भरदिवसा गजबजलेल्या बाजारपेठेत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडुन होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!