Edition

चांदोली परिसरात दमदार पाऊस,भात पिकास दिलासा:बळीराजा सुखावला.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

चांदोली प्रतिनिधी – चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस कोसळत असून शुक्रवारी सकाळपर्यंत २४ तासात ४६ मीलीमीटर तर दुपारी ४ वाजेपर्यंत आठ तासात २२ मीलीमीटर इतक्या पावसाची नोंद येथील पर्जन्य मापन केंद्रावर झाली आहे.

मुसळधार पावसामुळे परीसरातील ओढे नालेही प्रवाहीत झाले आहेत त्याचे पाणी वारणा नदीपात्रात येत असल्यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीतही वाढ होत आहे.

शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील खुदलापुर, मणदुर, सोनवडे, खोतवाडी, काळोखेवाडी आरळा, करूंगली, मराठेवाडीसह परीसरात गेल्या दोन दिवसापासून दमदार पाऊस कोसळत आहे पावसाचा जोर कायम राहील्यास परिसरातील डोंगरमाथ्यावरुन धबधबेही प्रवाहीत होतील.

परीसरात दमदार पावसास सुरुवात झाल्याने येथील भातपिकास दिलासा मिळाला असून येथील बळीराजा सुखावला आहे. दरम्यान चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासात ४६ मिलीमीटर तर दुपारी चार वाजेपर्यंत आठ तासात २२ मिलीमीटर पावसासह धरणक्षेत्रात आजअखेर २८८ मीलीमीटर पडला आहे या पावसामुळे धरणाच्या पाणी साठ्यातही हळुहळू वाढ होत असून सध्या धरणाची पाणीपातळी ५९९.१५ मीटर इतकी आहे तर धरणात सध्या ३४३.४०

द.ल.घ.मी म्हणजेच १२.१३ टि.एम.सी पाणीसाठा झाला आहे त्याची टक्केवारी ३५.२५ टक्के इतकी आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!