सांगली प्रतिनिधी – सांगली उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयात गेले दीड,दोन वर्षे झाले साहाय्यक परिवहन अधिकारी पद रिक्त होते. या पदावर साहाय्यक परिवहन अधिकारी म्हणून राहुल जगदाळे यांची नियुक्ती झाली याबद्दल रयत क्रांती वाहतूक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बजरंग भोसले व समर्थ वाहनधारक सेवा संस्थेचे सांगली जिल्हा अध्यक्ष शरिफ पठाण यांनी राहुल जगदाळे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. व पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समवेत आरटिओ अधिकारी आकाश गांलिदे, आरटिओ अधिकारी रोहन पांडकर उपस्थित होते.यावेळी बैठकीदरम्यान अध्यक्ष बजरंग भोसले व अध्यक्ष शरिफ पठाण यांनी जगदाळे यांच्या समोर व्यथा मांडल्या की जुन्या पुस्तकी वाहनांचे बॅकलॉक ऑनलाइन सेवा पूर्ण झाल्याशिवाय वाहनांची पुनरनोंदणी (रिपासिंग) करता येत नाही. वाहने वेळेत ऑनलाईन न झाल्यास पुनरनोंदणी करिता नागरिकांना जादा आर्थिक दंड भरावा लागत आहे. याकरिता वाहने ऑनलाईन तात्काळ व्हावी.जुनी वाहने रस्त्यावर फिरत असताना यदाकदाचित एखादी अपघातासारखी दुर्घटना घडल्यास यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होणार आहे. याकरिता जुनी पुस्तकी वाहनांची बॅकलॉक ऑनलाईन सेवेसाठी कार्यालयात सादर होत असणारा कागद सही शिक्क्याने पोच देऊन स्वीकारावा.कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सन्मानाची वागणूक द्यावी, नागरिकांची कामे जलद गतीने होत नाहीत अशी आमच्या संघटनेच्या कार्यालयाकडे नागरिकांच्या तक्रारी येत आहेत नागरिकांची कामे जलद गतीने व्हावी अशी आमची माफक अपेक्षा आहे. आमची संघटना नागरिकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारी संघटना आहे. तुम्ही नागरिकांची कामे जलद गतीने केल्यास याबाबत संघटना तुमचा कायम आदर सन्मान करेल असे शेवटी सांगण्यात आले..
राहुल जगदाळे म्हणाले की मी आताच पदभार स्वीकारला आहे.नागरिकांच्या सेवेसाठी माझी खुर्ची आहे मी काम करणारा अधिकारी आहे. आपण नागरिकांनी कागदपत्राची नियमानुसार योग्य ती पूर्तता करावी कामे प्रलंबित राहणार नाहीत तर नागरिकांची कामे जलद गतीने व्हावी यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असतो व असणार आहे नागरिक व आपल्यासारख्या संघटनेच्या व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे सुशासन नियमावलीनुसार नागरिकांची कामे केली जातील असे जगदाळे यांनी सांगितले. यावेळी इलाई मकानदार जुबेर दिवाण यास पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.












