Edition

यड्राव येथील विजयंत मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

यड्राव ( प्रतिनिधी ) : येथील विजयंत युवक मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी शैक्षणिक परिक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी कु. सन्मती सुरेश मालगावे हिने केंद्रात व विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. तीने इयत्ता दहावी परिक्षेत ९७ . ४० टक्के गुण मिळविले, कु. स्नेहल राजकुमार दानोळे हिने इयत्ता बारावी सीईटी परिक्षेत ९९ . ८० टक्के गुण मिळविले, कु. पार्श्व संग्राम मुराळे याने इयत्ता बारावी सीईटी परिक्षेत ९९ . १६ टक्के गुण मिळाविले, आणि कु. कल्याणी केशव धुमाळे हिने इयत्ता बारावी सीईटी परीक्षेत ९७ . ३० टक्के गुण मिळविले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा विजयंत युवक मंडळाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला व पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी मंडळाचे अध्यक्ष नेमगोंडा पाटील, उपाध्यक्ष क्रांतिसिंह मुराळे, सुशांत पाटील, सम्मेद नारगुडे, देवेंद्र पाटील, चंदू मालगावे, सम्मेद दानोळे, देशभुषण पाटील, संतोष दानोळे, विकास खोत, वीरसेन मालगावे, विरेंद्र मालगावे, तसेच मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!