Edition

गणपत दुर्गे यांची भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटकच्या मुळशी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
गणपत तुकाराम दुर्गे यांची भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (महासंघ) इंटकच्या मुळशी तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली हे नियुक्तीपत्र भारतीय राष्ट्रीय मजूर काँग्रेस इंटकच्या पुणे जिल्हाध्यक्ष ॲड धनंजय बुद्धिवंत यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सुवर्णा माने, पुणे जिल्हा महिला कार्याध्यक्षा अलिषा बुद्धिवंत, पुणे शहर अध्यक्ष इमरान शेख, पुणे शहर महिला अध्यक्षा मुमताज शेख, पुणे जिल्हा सचिव आनंद जंगम, पुणे जिल्हा महिला सचिव मेघा शेगर, पिंपरी चिंचवड अध्यक्ष अक्रम सय्यद, वडगाव शेरी प्रभाग क्रमांक ४ चे अध्यक्ष विजय जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी ॲड धनंजय बुद्धिवंत यांनी सांगितले संपूर्ण मुळशी तालुका मध्ये भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटकच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भक्कम बांधणी करण्यात येणार आहे तसेच इंटकच्या ध्येय धोरणांना आपण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार असे यावेळी म्हणाले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!