Edition

उत्तम जगताप राजर्षी शाहू महाराज राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

यड्राव ( प्रतिनिधी ) : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १५२ वी जयंतीचे औचित्य साधून राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र व जागृत नागरीक सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने सन २०२६ यावर्षीचा छत्रपती राजर्षी शाहू महाराज राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने उत्तम दगडू जगताप यांना सन्मानित करण्यात आले. समाजहित, मानवता, सामाजिक बांधीलकी व जनकल्याण, समाज कार्य व पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य व सामाजिक सेवेतील व्यक्तिमत्व यासाठी दिलेल्या अमुल्य योगदानाची दखल घेऊन राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र व जागृत नागरीक सेवा संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने कोल्हापूर येथील राजर्षी शाहू संस्कृतीक भवन येथे संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर, संभाजी थोरात, भगवान माने यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, फेटा देऊन छत्रपती राजर्षी शाहू महाराज राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार उत्तम जगताप यांना प्रदान करण्यात आला. यावेळी राज्य गुणावंत कामगार असोसिएशन व जागृत नागरीक सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी, व अजित मिसाळ उपस्थित होते. उत्तम जगताप यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेबद्दल त्यांच्यावर विविध क्षेत्रातून त्यांचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!