शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी, पत्रकारांना शिविगाळ करणाऱ्या व जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे खा संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण अंतर्गत तात्काळ कारवाई करीत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीचे निवेदन सेलु पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, पत्रकारांवर दिवसेंदिवस हल्ले होत आहेत आता तर लोकप्रतिनिधीही पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देत आहे ही लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना त्यांना शिवराळ भाषेचा वापर करुन जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार लोकशाहीला काळीमा फासणारी घटना आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर जर लोकप्रतिनिधी अश्या प्रकारे वागत असतील तर ही निंदनीय बाब आहे. खा संजय दिना पाटील यांच्या प्रकारानंतर राज्यभरात पत्रकारा मधुन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून खा संजय दिना पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली आहे.
घडलेल्या घटनांचा जाहीर निषेध करत सेलू तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सेलू पोलिस निरीक्षक अरुण नागरे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी तालुका अध्यक्ष लक्ष्मण बागल, सचिव शेख मोहसीन अहमद, सरचिटणीस मोहम्मद ईलीयास, जेष्ठ पत्रकार कांचन कोरडे, पुनमचंद खोना,अबरार बेग, निसार पठाण,संजय मुंढे, अजगर पठाण, अल्ताफ खान मास्टर, डिजिटल मिडियाचे अध्यक्ष गणेश सवणे, सदस्य सतीश आकात,दिपक जडे,निरज लोया आदी उपस्थित होते.











