Edition

नवनियुक्त केंद्र प्रमुखांचा श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या वतीने सन्मान.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

डॉ शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी, दि 26 जुलै रोजी सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात सेलू तालुक्यातील नवनियुक्त केंद्र प्रमुख यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी मुख्याध्यापक संजय धारासुरकर, ज्येष्ठ शिक्षक दिलीप बेदरकर, कृष्णा पांचाळ, नरेश पाटील, योगेश ढवारे, मंगेश कुलकर्णी, मुरलीधर खरात, प्रवीण चव्हाण,अण्णासाहेब गायकवाड,बाबासाहेब बदाले यांची उपस्थिती होती. शासनाच्या वतीने विभागीय केंद्र प्रमुख परीक्षेत इतिहासात पहिल्यांदाच केंद्र प्रमुख पद भरती महाराष्ट्रात करण्यात आली. यात संपूर्ण महाराष्ट्रात 2410 पदे हीं केंद्र प्रमुख परीक्षा व सिटीइटी परीक्षेत पात्र शिक्षकांमधून भरण्यात आली.
यात सेलू तालुक्यातील कन्या सेलू केंद्राचे केंद्र प्रमुख शेख मोजम,के प्रा शा सेलूचे केंद्र प्रमुख धंनजय ठोंबरे,डासाळा केंद्राचे केंद्र प्रमुख विजय तूरकर यांची नियुक्ती शासनाने केली आहे त्या बददल या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.तसेच राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली.सत्काराला उत्तर देताना केंद्र प्रमुख धनंजय ठोंबरे यांनी येणाऱ्या काळात सेलू तालुक्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर भर असेल व मराठी शाळासाठी सर्वांनी मिळून काम करूया असे आवाहन केले.शाळेच्या वतीने केलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी शाळेचे आभार व्यक्त केले.
सूत्रसंचालन व आभार योगेश ढवारे यांनी मानले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!