Edition

मसला पेन येथे पशुसमूह जंतुनिर्मूलन जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

जिल्हा प्रतिनिधी – संतोष भालेराव, वाशिम : रिसोड तालुक्यातील मसला पेन येथे २४ जून ला सकाळी ११:३० वाजता पशुधनाच्या आरोग्य संवर्धनासाठी इंडुजा महिला मिल्क प्रोड्युसर कंपनी लिमिटेड,. यवतमाळ यांच्या वतीने पशुसमूह जंतुनिर्मूलन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास परिसरातील पशुपालक व शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमादरम्यान पशुधनामध्ये होणाऱ्या अंतर्गत व बाह्य जंत संसर्गामुळे दूध उत्पादन, जनावरांची वाढ आणि एकूण आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पशुधन निरोगी व उत्पादनक्षम राहण्यासाठी वेळोवेळी जंतनाशक औषधांचा वापर करण्याचे महत्त्व उपस्थितांना पटवून देण्यात आले.
यावेळी पशुपालनातील आधुनिक तंत्रज्ञान, पशू आरोग्य व्यवस्थापन तसेच जंतनिर्मूलनासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. विनोद अवचार यांनी विशेष पुढाकार घेतला.
कार्यक्रमाला डॉ. पंकज गावंडे, प्रज्वल कडू, रोडगे सर, सुपरवायझर कुलदीप ठाकरे, यादनेश ढोले, योगेश राठोड यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. उपस्थित पशुपालकांनी अशा उपयुक्त व मार्गदर्शक जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन भविष्यातही करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

traffic tail
error: Content is protected !!