Edition

राज्यस्तरीय कामगार रत्न पुरस्कारासाठी राहुल मलगोंडा पाटील यांची निवड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शिरोळ प्रतिनिधी सुभाष कोळी : छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून राज्य गुणवत कामगार असोसिएशन व महाराष्ट्र जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात कोल्हापूर येथील राहुल मलगोंडा पाटील यांची “राज्यस्तरीय कामगार रत्न पुरस्कार – २०२६” साठी निवड करण्यात आली आहे.
आपल्या कार्यक्षेत्रात केलेले उल्लेखनीय योगदान, समाजाप्रती असलेली समर्पण भावना, त्याग आणि समाजभिमुख कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विविध सामाजिक, कामगार व जनहिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल राहुल पाटील यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.
सदर पुरस्कार मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असून या सोहळ्यास सहकुटुंब उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. राज्यभरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा या कार्यक्रमात गौरव होणार आहे.
हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे. संस्थापक अध्यक्ष सुरेश शंकर केसरकर यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!