Edition

गोसेवा हीच ईश्वर सेवा; चौडेश्वरी गोशाळेला दानशूरांकडून चारा दान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

आष्टा, ता. वाळवा (प्रतिनिधी): आष्टा-वाळवा रोडवरील चौडेश्वरी गोशाळेत रविवारी (दि. 21 जून 2026) नवेखेड येथील दानशूर व्यक्तींनी गोमातेसाठी मोठ्या प्रमाणात चारा दान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. यावेळी मा. दत्तात्रय कणसे, मा. दिलीप गुजवटे आणि मा. बाबुराव जाधव यांनी गोशाळेला चाऱ्याचे उदार हस्ते दान केले.
गोसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून दत्तात्रय कणसे यांच्याकडून सातत्याने गोसेवेचे कार्य केले जात असून, मुक्या जनावरांप्रती त्यांची असलेली आस्था आणि सेवाभाव परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे. गोमातांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा मानून ते सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत आहेत.
चौडेश्वरी गोशाळेत अनेक गोवंशांचे संगोपन केले जात असून, अशा दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे गोशाळेचे दैनंदिन कामकाज अधिक सक्षमपणे सुरू राहते. समाजातील नागरिकांनीही आपल्या परीने गोसेवेसाठी हातभार लावावा, असे आवाहन गोशाळा व्यवस्थापनाने केले आहे.
गोसंवर्धन आणि गोसेवा या पवित्र कार्यासाठी परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांना अधिक बळ मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
संपर्क :
चौडेश्वरी गोशाळा, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली (वाळवा रोड)
📞 7028288076 / 7028288578

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!