Edition

चैन स्नॅचिंग प्रकरणाचा छडा; दोन सराईत गुन्हेगार जेरबंद, ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ढेबेवाडी प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील गलमेवाडी-येवती घाट परिसरात घडलेल्या चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा ढेबेवाडी पोलिसांनी यशस्वी छडा लावत दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. आरोपींकडून ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनीमंगळसूत्र व डोले तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली बजाज पल्सर 220 मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
दिनांक २२ जून २०२५ रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास गलमेवाडी (ता. पाटण) येथील आक्काताई राजाराम चोरगे (वय ६०) या गुरे चारून घरी परतत असताना दोन अज्ञात इसमांनी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून येऊन त्यांच्या गळ्यातील सुमारे ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनीमंगळसूत्र व डोले हिसकावून नेले होते. याप्रकरणी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६३/२०२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत गलमेवाडी ते फलटण दरम्यान सुमारे १५० किलोमीटर परिसरातील महत्त्वाच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच फलटण ग्रामीण पोलीस, बारामती पोलीस आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने संशयितांचा शोध घेण्यात आला.
तपासादरम्यान साजन पवन भोसले (रा. सोनगाव, ता. फलटण, जि. सातारा) यास १० जून २०२६ रोजी फलटण येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने चैतन्य शंकर लांडगे (रा. सोनगाव बंगला, ता. फलटण, जि. सातारा) याच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर साजन भोसले यास अटक करून न्यायालयीन प्रक्रियेनंतर कोठडीत पाठविण्यात आले.
दुसरा आरोपी चैतन्य लांडगे याचा शोध घेत पोलिसांनी १८ जून २०२६ रोजी पुणे जिल्ह्यातील सहयोगनगर येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. १९ जून रोजी त्याला अटक करून न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळविण्यात आली. चौकशीत आरोपींकडून चोरीस गेलेला संपूर्ण सोन्याचा ऐवज आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या सूचनेनुसार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण दाईगडे, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित चव्हाण आणि त्यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार नवनाथ कुंभार करीत आहेत.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

traffic tail

चिकोडी येथे सी.बी.एस. ई प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भेट दिली असता त्यांचे स्वागत करताना जिल्हा समन्वयक डॉ. मिथुन देशपांडे सीबीएसई प्रादेशिक अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट व सीटीईटी परीक्षा केंद्राबाबत महत्त्वपूर्ण चर्चा

error: Content is protected !!