
तारदाळ (ता. हातकणंगले): येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रिंगण सोहळ्यात कन्या व कुमार विद्या मंदिर, तारदाळ येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वतीने पारंपरिक पद्धतीने या रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर व गाव दुमदुमून गेले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि फुगड्यांच्या खेळात विद्यार्थ्यांनी गोल रिंगण पूर्ण करत वारीचा आनंद लुटला.
या सोहळ्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय चोपडे, विलास कोळी सर, शाळेचा सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ, तसेच गावातील सर्व ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदायातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लहान वयातच विद्यार्थ्यांवर धार्मिक आणि सांस्कृतिक संस्कार व्हावेत, या उद्देशाने शाळेने या उपक्रमात सहभाग नोंदवला. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समितीचे पदाधिकारी, आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.-रुक्मिणी मंदिराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रिंगण सोहळ्यात कन्या व कुमार विद्या मंदिर, तारदाळ येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वतीने पारंपरिक पद्धतीने या रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते
‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर व गाव दुमदुमून गेले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि फुगड्यांच्या खेळात विद्यार्थ्यांनी गोल रिंगण पूर्ण करत वारीचा आनंद लुटला.
या सोहळ्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय चोपडे, विलास कोळी सर, शाळेचा सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ, तसेच गावातील सर्व ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदायातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लहान वयातच विद्यार्थ्यांवर धार्मिक आणि सांस्कृतिक संस्कार व्हावेत, या उद्देशाने शाळेने या उपक्रमात सहभाग नोंदवला. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समितीचे पदाधिकारी, आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.









