
भाऊबीज निमित्त
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ख्रिश्चन आघाडीच्या वतीने घोरपडी गाव येथील संविधान चौकामध्ये सुमारे 500 महिला भगिनींना साड्या वाटपचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश महासचिव बाळासाहेब जानराव व पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या हस्ते महिला भगिनींनास साड्या वाटप करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ख्रिश्चन आघाडी पुणे शहर अध्यक्ष क्रिस्तोफर राजमनी यांनी केले होते. यावेळी पुणे शहर सरचिटणीस महिपाल वाघमारे, पुणे शहर उपाध्यक्ष अर्जुन अल्हाट, पुणे शहर महिला अध्यक्षा डॉर्थी थॉमस, राजश्री मुदलियार, वडगाव शेरी महिला अध्यक्षा चांदणी गायकवाड, मुंढवा विभाग अध्यक्ष किरण सूर्यवंशी, घोरपडी गाव अध्यक्ष विनेश पिल्ले,स्टॅन्ली नाथन, दिलीप जोसेफ,ॲजलेंस अँथोनी, आरपीआय पुणे शहर उपाध्यक्ष येशू दोरास्वामी,ॲग्निस एंथोनी, रवी मुदलियार, सिरीयल मरियान, अंजली पिल्ले,जॉनसिंग मुनवर, राजू मोजेस, सेल्वराज पिल्ले, विनोद रंगा, आदी उपस्थित होते.










