Edition

पुणे शहरातील शिवसेना भवन मध्ये सुरू होणार मोफत अभ्यास वर्ग आणि अभ्यासिका डॉ नीलम गोऱ्हे.

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुणे प्रतिनिधी शंकर जोग
पुणे शहरातील शिवसेना भवन मध्ये सुरू होणार विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासवर्ग आणि अभ्यासिका दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या वाटा या विषयावर व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ गोऱ्हे यांनी सांगितले दहावी बारावीनंतर नेमकं काय करिअर निवडायचे असा प्रश्न अनेकांना पडतो आजकालच्या स्पर्धेच्या जगामध्ये सर्व पालकांना आपला मुलगा किंवा मुलगी सेटल व्हावे असे वाटते म्हणून विद्यार्थ्यांनी कठोर परीक्षण करून आपल्या करिअरमध्ये नावलौकिक करून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना पुणे शहर जिल्हा शिक्षक शिक्षकेतर संघाचे प्रमुख अनिल गडकरी सर, निलेश जगताप, अश्विनी मटारे, यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी शिक्षकतज्ञ व समुपदेशक अनिल गुंजाळ सर, विजय कचरे सर सहशिक्षक समुपदेशक यांची विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने झाली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना निवडणूक राज्य समन्वयक व धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष राज्य प्रमुख वैभव वाघ, संदीप शिंदे, प्रकाश ढमढेरे, विश्वास दिघे सुधीर जोशी सुदर्शना त्रिगुणाताई आदी उपस्थित होते.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

“मोजणीला आले तर रक्त सांडू”: ऐतवडे खुर्दचा शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध, शेतकरी नेते हनुमंत पाटलांचा सरकारला थेट इशारा.. 2019 च्या महापुरात 85% गाव पाण्याखाली, महामार्ग झाला तर 100% गाव बुडणार; “आम्ही आत्महत्या करणार नाही, लढू” – भूमिहीन होण्याच्या भीतीने शेतकरी आक्रमक.

traffic tail
error: Content is protected !!