विशालक्रांती न्यूज.
प्रतिनिधी अमर माने मलिकवाड.
हिरेकुडी (ता.चिकोडी)येथील रहिवासी जयपाल नरसप्पा बाळीकाई (वय ८०) यांचे शनिवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे आकस्मिक दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने बाळीकाई कुटुंबीयांसह हिरेकुडी व मलिकवाड परिसरात शोककळा पसरली आहे.
जयपाल बाळीकाई हे सदैव उत्साही, मनमिळाऊ, धार्मिक वृत्तीचे, दानशूर आणि धर्मानुरागी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. मलिकवाड येथील जैन मंदिराच्या उभारणीमध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले होते.
जैन धर्माविषयी त्यांना विशेष आस्था होती. धार्मिक आणि सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या सहकार्यामुळे व योगदानामुळे ते परिसरातील नागरिकांच्या स्मरणात सदैव राहतील.
त्यांच्या आकस्मिक निधनामुळे बाळीकाई कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील नागरिक, नातेवाईक आणि मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन विधी कार्यक्रम सोमवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता होणार आहे.
त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली!










