Edition

डॉ. संदीप वाटेगावकर यांची अमेरिकेच्या ‘सेम्स’ संस्थेच्या असोसिएट फेलो पदी निवड

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

कोल्हापूर: अमेरिकेतील सोसायटी फॉर एनर्जी मटेरिअल अँड सस्टेनॅबिलिटी या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संस्थेच्या प्रतिष्ठित ‘असोसिएट फेलो’ पदी वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाचे रिसर्च डायरेक्टर डॉ. संदीप राजाक्का भास्कर वाटेगावकर यांची निवड झाली आहे. ऊर्जा, प्रगत पदार्थ विज्ञान आणि शाश्वत तंत्रज्ञान या संशोधन क्षेत्रांतील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन ही आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे.
सुपरकॅपॅसिटर, ऊर्जा साठवण तंत्रज्ञान, मेटल ऑक्साइड नॅनोमटेरियल्स, सौरऊर्जा आणि पर्यावरणपूरक पदार्थांची निर्मिती या विषयांवर त्यांचे संशोधन केंद्रित आहे. त्यांच्या नावावर भारत, जर्मनी आणि ब्रिटनमधील पेटंट्स असून ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. तसेच, २०२४ ते २०२६ या कालावधीत अमेरिकेच्या स्कॉलर जीपीएस संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात त्यांचा जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीत समावेश झाला आहे.

डॉ वाटेगावकर म्हणाले, “सेम्स या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थेने असोसिएट फेलो म्हणून माझी निवड केल्याबद्दल मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. हे यश माझ्या संशोधन प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असून, यामागे माझे आई वडील, भाऊ, पत्नी, मुलगी, जनता शिक्षण संस्था व किसन वीर महाविद्यालय मॅनेजमेंट, मार्गदर्शक, सहकारी संशोधक, यांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन व सहकार्य आहे. ऊर्जा साठवण, नॅनोमटेरियल्स आणि शाश्वत तंत्रज्ञान या क्षेत्रांत जागतिक स्तरावर उपयुक्त ठरेल असे संशोधन करण्याचा माझा प्रयत्न यापुढेही सुरू राहील. ही निवड माझ्यासाठी केवळ सन्मान नसून संशोधन क्षेत्रात अधिक जबाबदारीने योगदान देण्याची प्रेरणा आहे.”

‘सेम्स’ ही ऊर्जा, प्रगत पदार्थ विज्ञान, शाश्वत विकास आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान या क्षेत्रांतील संशोधनाला प्रोत्साहन देणारी आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संस्था आहे. असोसिएट फेलो हे सदस्यत्व संशोधन आणि नावीन्यपूर्ण कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संशोधकांना प्रदान केले जाते.

डॉ. संदीप वाटेगावकर यांची या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संस्थेच्या असोसिएट फेलो म्हणून झालेली निवड ही महाराष्ट्राच्या संशोधन क्षेत्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. त्यांच्या या यशामुळे ऊर्जा साठवण, नॅनोमटेरियल्स आणि शाश्वत तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळण्यास मदत होणार आहे.

या निवडीबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.मदनदादा भोसले, उपाध्यक्ष श्री शंकरराव गाढवे, सचिव डॉ.जयवंत चौधरी, खजिनदार श्री नारायणराव चौधरी, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा.(डॉ.) विनोद वीर , सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

हिरेकुडी येथील ज्येष्ठ नागरिक जयपाल नरसप्पा बाळीकाई यांचे आकस्मिक दुःखद निधन.मलिकवाड येथील जैन मंदिराच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या धार्मिक व दानशूर व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली!*

traffic tail

हिरेकुडी येथील ज्येष्ठ नागरिक जयपाल नरसप्पा बाळीकाई यांचे आकस्मिक दुःखद निधन.मलिकवाड येथील जैन मंदिराच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या धार्मिक व दानशूर व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली!*

error: Content is protected !!