Edition

जैन अभिवृद्धी निगमला मान्यता ; हाताच्या चिन्हाचा इतिहास सांगत सवदींची माहिती*

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मंगळुरू :* काँग्रेस पक्षाच्या चिन्हाबद्दल वाद सुरू असताना जैन मुनींनी दिलेल्या आशीर्वादाचा इतिहास सांगत सहकार सचिव लक्ष्मण सवदी यांनी जैन अभिवृद्धी निगम स्थापनेस मान्यता मिळाल्याची माहिती दिली.

ते म्हणाले, “त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाबद्दल वाद सुरू होता. याआधी गाय-वासरू हे चिन्ह होते. ते चिन्ह गेल्यानंतर नवे चिन्ह कोणते घ्यावे, यावरून वाद सुरू होता.”

“अशा वेळी *भारत गौरव आचार्य श्री १०८ देशभूषण मुनी महाराजांचे शिष्य आचार्य श्री १०८  विद्यानंद मुनी महाराजांनी* माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना चांदीच्या हाताचे चिन्ह देऊन आशीर्वाद केला होता. तोच हात पुढे काँग्रेस पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह झाला.”

“जैन समाजाने काँग्रेसला दिलेल्या त्या आशीर्वादाचे ऋण फेडण्यासाठी, तसेच किनारपट्टी भागात मोठ्या संख्येने असलेल्या जैन समुदायाच्या मागणीनुसार विशेष ‘जैन अभिवृद्धी निगम’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतची फाईल दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आली आहे,” असे सवदी यांनी सांगितले.

या निर्णयामुळे जैन समाजात आनंदाचे वातावरण असून, निगम स्थापनेमुळे समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.

*– अनिलकुमार डेक्कण्णवर, सदलगा (NEJ)*

Vishal Kranti
Author: Vishal Kranti

Leave a Comment

और पढ़ें

हिरेकुडी येथील ज्येष्ठ नागरिक जयपाल नरसप्पा बाळीकाई यांचे आकस्मिक दुःखद निधन.मलिकवाड येथील जैन मंदिराच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या धार्मिक व दानशूर व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली!*

traffic tail

हिरेकुडी येथील ज्येष्ठ नागरिक जयपाल नरसप्पा बाळीकाई यांचे आकस्मिक दुःखद निधन.मलिकवाड येथील जैन मंदिराच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या धार्मिक व दानशूर व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली!*

error: Content is protected !!